श्री दत्तच्या विश्वस्तानी सामाजिक बांधिलकी जपली :गणपतराव पाटील
श्री दत्त कारखाना व शिरोळकरांचे ऋणानुबंध घट्ट : प्रताप उर्फ बाबा पाटील
शिरोळ : सलीम माणगावे
दि १६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या विश्वस्थानी केवळ शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून साखर निर्मिती केली नसून सामाजिक जाण ठेवून विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजात आदर्शवत काम करण्याची परंपरा कायम राखली आहे शेतकरी सभासद व कामगार बंधूंचे हित साधने बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा काटकरपणे प्रयत्न केला आहे यामुळेच सहकार क्षेत्रातील आदर्श साखर कारखाना म्हणून श्री दत्त कडे पाहिले जाते कारखान्याच्या प्रगतीसाठी सभासदांनी पुन्हा एकदा विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी केले
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या वतीने शिरोळ येथील हरी मंदिर येथे सभासद संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते पंचांगात साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील हे या सभेच्या होते
या सभेत बोलताना गणपतराव पाटील पुढे म्हणाले कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी आती पाणी व रासायनिक खताच्या वापरामुळे क्षारपड बनल्या होत्या यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे झाले या जमिनी सुपीक करण्यासाठी कारखान्याच्या वतीने चारपडमुक्त जमीन हा प्रकल्प राबवून दहा हजार एकर जमीन पिकाऊ केली करून त्या शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलवण्याचे काम श्री दत्त साखर कारखाना करत आहे. शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत. उसाचे एकरी 200 टनाचे उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांना लागणारी सर्व प्रकारचे औषधे, खते उपलब्ध करून शेतीतज्ञांकडून संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. माती, पाने, पाणी परीक्षणाची बांधावर सोय करण्यात आली आहे कारखान्याच्या आरोग्य केंद्रातून सभासदांच्या कुटुंबीयांना अल्प दरात तज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. सभासदांची मुलं शिकावीत यासाठी आयटीआय पॉलिटेक्निक डिग्री कॉलेज सुरू करून शैक्षणिक सुविधा देण्याचा काम या विश्वस्त मंडळांनी केलं आहे व्यायाम शाळा व क्रीडांगणाच्या माध्यमातून परिसरातील मुलं विविध पोलीस सैनिक यात भरती व्हावेत याकरिता प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते याचा 200 हून अधिक मुलांना लाभ झाला ते आता शासकीय सेवेतून मंजूर झाले आहेत कोरोना काळात कोविड सेंटर उभा करून रुग्णांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सेंद्रिय शेती देशी वाण बीज बँक महिलांच्या प्रगतीसाठी व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर युवकांना रोजगाराचे संधी उपलब्ध व्हावी याकरिता विविध कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी प्रयत्न शिरोळ परिसरातील सर्व सामाजिक उपक्रमात दत्त कारखाना नेहमीच योगदान देत आहे हे करीत असताना सभासद व कामगार बंधूंचे हित डोळ्यासमोर ठेवून स्वच्छ आणि पारदर्शक कारभार कारखान्याने नेहमीच केला आहे दत्त कारखाना परिसरामध्ये क्षारपड मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. आगामी काळात या शेतजमिनी मधून ऊस उत्पादन वाढणार आहे. याचा विचार करून कारखान्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त उसाचे गाळप व्हावे, कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊ नये आणि गाळप कमी वेळेत व्हावा, हा उद्देश ठेवून विस्तारीकरण केले आहे. यामध्ये वैयक्तिक अथवा संचालक मंडळाचा कोणताही स्वार्थ नाही याचा सर्वांगीण विचार करून सभासदांनी पुन्हा एकदा काम आम्हाला विश्वस्त म्हणून करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले
प्रताप उर्फ बाबा पाटील बोलताना म्हणाले की शिरोळच्या पोटात श्री दत्त साखर कारखाना आहे यामुळे शिरोळकर आणि दत्त कारखान्याचे ऋणानुबंध घट आहेत शिरोळच्या विकासात दत्त कारखान्याची ही योगदान आहे यामुळे शिरोळकरही नेहमीच दत्त कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत यापुढेही कारखान्याच्या माध्यमातून शिरोळच्या प्रगतीसाठी प्रयत्न असावे शिरोळकर ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला
युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव रणजीतसिंह पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई घालवायचे शार्पण सुधारणा शेतकरी संस्थेचे चेअरमन खोंद्रे यांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांनी श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचे काम केले आहे या परिसरातील सभासद त्यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या संचालक मंडळास उच्चांकी मताने निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला
दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ दगडू माने यांनी आभार मानले उदय शिरोळकर यांनी सूत्रसंचालन केले यावेळी माजी सरपंच गजानन संकपाळ गोरखनाथ माने युवा नेते विराजसिंह यादव माजी नगरसेवक प्रकाश गावडे योगेश पुजारी दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर दरगोबा दूध संस्थेचे चेअरमन आप्पासो गावडे आनंदराव माने देशमुख अवधूत उर्फ बाबाजी पाटील दिलीपराव माने बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगधर देवाप्पा पुजारी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.