शिरोळ दत्तसाठी चेअरमन, व्हा.चेअरमन सह संचालकांसह ५४ अर्ज दाखल
शिरोळ : सलीम माणगावे
दि १७ :शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. यासाठी सोमवार अखेर चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह संचालक त्याचबरोबर चेअरमन पाटील यांची कन्या यासह अपक्ष असे५४ जणांचे अर्ज सोमवारी दाखल झाले. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती .
शिरोळ दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी यांच्याकडे अर्ज दाखल केले. यात चेअरमन गणपतराव पाटील, व्हा.चेअरमन अरूणकुमार देसाई, संचालक अनिलराव यादव, रघुनाथ पाटील, दरगू गावडे, प्रमोद पाटील, संध्या पाटील, अस्मिता पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, शेखर पाटील, विनया घोरपडे, संगीता पाटील-कोथळीकर, निजामसो पाटील, अमर यादव, विश्वनाथ माने, जोतीकुमार पाटील,सुरेश कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले.
तर विरोधात माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत उत्पादक सभासद गट ४४ , अनूसूचित जाती २ , महिला ६ , संस्था गट २ असे एकूण ५४ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मुदत होती . गुरूवारी छाननी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी अंतिम यादी प्रसिध्द होणार असून २४ जुलै रोजी मतदान होणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.