डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सीए विद्यर्थ्यांचा सत्कार

इचलकरंजी:विजय मकोटे 
दि .४ : येथील डीकेटीई कॉमर्स कॉलेजमध्ये सी.ए. फायनल परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीकेटीई संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या.
प्रास्ताविक कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. खानाज यांनी केले. माजी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मा. सौ. सपना आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये हर्षा बांगड, ओंकार विभूते, मिली माहेश्वरी, राधा जडार, रौनक ओसवाल, गणेश कोष्टी, जगदीश धूत,  वरुण राठी, मोहित दरक, ओंकार मिरजे, हर्ष हेडा, निकिता कंदोई, शुभम शहा, ऋतुजा पाटील,  रितीक जैन, रितिका मंत्री, हर्ष छापरवाल यांचा समावेश होता.
यावेळी  शैक्षणीक समुपदेशक अशोक केसरकर, प्राचार्या सौ. कासार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन  सावंत यांनी केले. सौ. अग्निहोत्री यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×