वायनाड भूस्खलनग्रस्तांना संजय घोडावत फाउंडेशनतर्फे 11 लाखांची मदत
जयसिंगपूर:सलीम माणगावे
दि .५: केरळ राज्यातील वायनाड येथे झालेल्या महाकाय भूस्खलनात ३०० हून अधिक लोक मरण पावले . अनेक कुटुंब उध्वस्त झाली.या भूस्खलनग्रस्त पीडितांच्या मदत कार्यासाठी म्हणून संजय घोडावत सोशल फाउंडेशन ने ११ लाखांची मदत देऊ केली आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या दातृत्वाने प्रेरित असलेले सोशल फाउंडेशन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. वायनाड येथे झालेली जीवित व वित्तहानीची भरपाई होणे शक्य नाही. परंतु या दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबांना फाउंडेशन च्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
आजवर संजय घोडावत सोशल फाउंडेशन ने दिव्यांगांसाठी शाळा, पूरग्रस्त, अनाथालय,दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रम, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्य केंद्र, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे. कोरोना काळामध्ये 5 लाख लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. कोविड केअर सेंटरची उभारणी करून उत्तम अशा आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. यामध्ये 37 हजार 500 रुग्णांनी उपचार घेतले. या आधी कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांना वेळोवेळी आर्थिक व कौटुंबिक साहित्याचे वाटप करून आधार दिला आहे.
फाउंडेशन द्वारे सौजन्याची वारी आली आपल्या दारी हा उपक्रम राबवून गरजूंना तातडीने मदत दिली जाते.आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदानातून जीवदान दिले आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी फाउंडेशन द्वारे कन्या महाविद्यालयाची स्थापना केली आहे.सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी 3 लाखांच्या वर फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.