शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : सचिन पाटोळे 

दि .५ :संगमेश्वर  तालुक्यातील  कुचांबे  येथील  शिववैभव पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि. मुंबईचा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला .सदरचा  पुरस्कार   महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड चे  अध्यक्ष काका कोयटे, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी संस्थेतर्फे पुरस्कार  स्वीकारताना पतसंस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश थेराडे (चार्टर्ड अकाउंटंट) श्री संतोष थेराडे ,संकेत थेराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 ज्या पत संस्थेकडे ५० ते १०० कोटी ठेवी आहेत त्यांना सदरचा पुरस्कार देण्यात आला . मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकण विभागातून शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,कुचांबे पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.पत संस्थेच्या सभासद ,ठेवीदार ,संचालक मंडळ आदिच्या  मुळे हा पुरस्कार झाला आहे .त्यामुळे त्यांचे सर्वांचे आभार व अभिनंदन करतो असे चेअरमन  प्रकाश  थेराडे म्हणाले .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×