शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 26 वी सर्वसाधारण सभा संपन्न.
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि.१२ : जिल्हा कार्यक्षेत्र असलेली संगमेश्वर तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक असलेली कुचांबे येथील शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २६ वी सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी खेळीमेळीत संपन्न झाली .सुरवातीस छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाली.आणि संस्थेचे संस्थापक व सी ए प्रकाश थेराडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली.सुरवातीस संस्थेचा आहवाल वाचून दाखविला .त्त्या नंतर सभेची नोटीस वाचण्यात आली सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानी मंजुरी दिली . संपूर्ण कार्यक्रमाची धुरा रत्नागिरी जि.प.मा.अध्यक्ष व संस्थेचे सरचिटणीस श्री.संतोष थेराडे यांनी सांभाळली .

४ मार्च १९९८ रोजी शिववैभव पतसंस्थेची स्थापना झाली. या पतपेढी ने आपल्या नावाला साजेसे कार्य करत असुन सहकार क्षेत्रातील पतसंस्थामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. माणसाने माणुस जोडावा, उत्तम पारदर्शी व्यवहाराने धन जोडावे, उत्तम चारित्र्याने नाती जोपासावी स्वतः बरोबर इतरांचे, गरजूंचे समाजातील विविध घटकांचे जीवन सुखी समृद्ध व प्रगतीशील व्हावे अशी संस्थेची इच्छा आहे. सहकारातून सर्वसामान्यांची समृद्धी हे संस्थेचे ब्रीद आहे. शिववैभवच्या विविध ठेव योजना आहेत. सभासदांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन योजना संस्था सादर करत आहे. संस्थेच्या ठेवींमधे सातत्याने होत असलेली वाढ यातुन ठेवीदारांचा संस्थेवरील असलेला विश्वास स्पष्ट होतो. काही दिवसांपूर्वीच या पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लि.मुंबईचा मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरवर्षी या संस्थेने “अ” ऑडिट वर्ग घेऊन आपला दर्जा टिकवून ठेवला आहे .२५ वर्षांची परंपरा राखून ठेवत वर्षान वर्षी अनेक गावा गावांत शहरा शहरात शाखा विस्तार सुरू आहेत.
सन १९९८ पासुन आजरोजी पर्यंत प्रथम शाखा कुचांबे,पासून सावार्डे,माखजन, नांदगाव,कडवई, आरवली,पुणे, चिपळूण,कोकरे,परळ(मुंबई),दिवा (मुंबई), भांडुप (मुंबई).विस्तारलेली आहे.
संगमेश्वर ( धामणी ), दापोली,आबीटगाव. येथे लवकरच नवीन शाखेचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई लि. यांच्यावतीने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार २०२४ हा शिववैभव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुचांबे. यांना मिळाला त्याबद्दल जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा, कुचांबे यांच्यावतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब पवार सर यांच्या हस्ते .शिववैभव पतसंस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. प्रकाशजी थेराडे आणि पतसंस्थेचे सरचिटणीस श्री. संतोषजी थेराडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सी .ए .श्री . प्रकाश थेराडे, सरचिटणीस श्री.संतोष थेराडे,श्री. सिताराम थेराडे,श्री.सिताराम कदम,श्री.संजय कानाल,श्री.तुकाराम काजवे,सौ.शुभांगी थेराडे, पोलिस पाटील सुदर्शन कदम,रविंद्र थेराडे, मा.सरपंच श्री. रविंद्र काजवे, सरपंच सौ. वंदना थेराडे, उपसरपंच श्री.समीर चव्हाण, सतीश थेराडे, संकेत थेराडे, प्रियंका चांदे दामीनी धनावडे व इतर सर्व शाखेचे कर्मचारी वर्ग,शेनावडे सरपंच दत्ताराम लाखन, कडवई सरपंच सौ.कुवळेकर.शिवसेना विभाग प्रमुख श्री.उजगावकर व या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.