ताराराणी पक्षाच्या वतीने भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१६:ताराराणी पक्षाच्या वतीने भारत देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणातील समारंभात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरी आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, सुनिल पाटील, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, रमेश कबाडे, सौ. उर्मिला गायकवाड, संजय केंगार, नरसिंह पारिक, महावीर कुरुंदवाडे, अरुण निंबाळकर, सतीश मुळीक, श्रीरंग खवरे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ताराराणी पक्षाचे पदधिकारी, सदस्य व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.