राधा गोविंद फाउंडेशन, सावर्डे पुरस्कृत मुक्तांगण आयोजित पारंपारिक नृत्य कला स्पर्धा
संगमेश्वर:
राधा गोविंदा फाउंडेशन सावर्डे पुरस्कृत मुक्तांगण आयोजित संगमेश्वर विभागातील पारंपारिक नृत्य कला स्पर्धा 2024 दिनांक 16 ऑगस्ट रोजी राजे शिर्के हॉल खेरशेत आरवली येथे पार पडली.
यामध्ये संगमेश्वर विभागातून एकूण 11 महिला गटांनी सहभाग घेतला होता.पारंपारिक नृत्य कलेमध्ये मंगळागौर,टिपरी नृत्य,समई नृत्य इत्यादींचा समावेश होता.नृत्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस संगमेश्वर विभागातून संगमेश्वर नावडीच्या अमृता ग्रुप या महिला गटाने प्राप्त केला.या महिलांना सौ.पूजा ताई निकम मॅडम यांच्या हस्ते रोख रक्कम दहा हजार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आली.त्यांनी पारंपारिक नृत्य कलेचा मंगळागौर हा खेळ अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केला त्यामध्ये 14 प्रकारच्या फुगड्यांचा प्रकार आणि सासूबाईंचं पारंपारिक धूण,पूर्वीच्या काळच दळण कांडण,दोडका किसने, लाटण्यांचा खेळ,वाकडा झिम्मा असे एकूण मंगळागौरीचे 23 प्रकार तेथे सादर केले.या स्पर्धेसाठी तीन परीक्षक नेमण्यात आले होते.त्या परीक्षकांच्या नियमानुसार निकाल जाहीर करण्यात आला.
संगमेश्वरच्या या महिला बचत गटाच्या माध्यमातून गेली पाच वर्ष सतत विविध उपक्रम संगमेश्वर मध्ये राबवित आहेत तसेच तालुक्यामध्येही त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
संगमेश्वर नावडीच्या अमृता ग्रुप मधील सहभागी महिला अमृता कोकाटे,जानवी चिचकर,सविता हळदकर,आर्या मयेकर,सुविधा शेट्ये,अर्पिता शेरे,अर्चना शेट्ये,सानिका कदम,सुप्रिया कदम,अनिता जंगम गौरी सावंत,जुई सुतार आणि तबलावादक गिरीराज लिंगायत या सर्वांनी मिळून मंगळागौरीचा एक सुंदर अविष्कार सादर केला.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय शेखरजी निकम साहेब त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुजाताई निकम मॅडम आणि त्यांची मुलगी सई ताई निकम या उपस्थित होत्या.संगमेश्वर विभागातून मुक्तांगण आयोजित पारंपारिक नृत्य कला स्पर्धेचे आयोजक म्हणून सौ. योगिनी शैलेश डोंगरे यांनी काम पाहिले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.