इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३० : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त घेण्यात येणार्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळविला. तर कसबे डिग्रजच्या श्री जी बोट क्लब अ ने दुसरा, इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लब ने तिसरा आणि समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लब ने चौथा क्रमांक मिळविला.
इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १० बोट क्लबने सहभाग नोंदविला होता. शर्यतीचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमगा विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
स्पर्धेनंतर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी अजय जाधव, सुनिल पाटील, बाळासाहेब जांभळे, सानिका आवाडे, शेखर शहा यांच्यासह इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळतगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, किशोर पाटील, राहुल घाट, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, अग्नु लवटे, राजू बोंद्रे, दीपक सुर्वे, सतीश मुळीक, नितेश पोवार, प्रितम गुगळे, राजू पुजारी आदींसह मान्यवर व शर्यत शौकिन उपस्थित होते. सूत्रसंचालक राजेंद्र बचाटे यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.