कोल्हापूरमध्ये उत्सवकाळात होणाऱ्या ट्राॅली शो व अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींच्या वर बंदी घाला :
आखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांची निवेदनद्वारे मागणी
कोल्हापूर:सौ .रेणू पोवार (जिल्हा प्रतिनिधी)
दि.४ : कोल्हापूर जिल्हा हा कलेचे माहेर घर आहे . राजश्री श्री छत्रपती शाहु महाराज यांनी देखील कलेला सन्मान केला आहे आणि त्यास प्रोत्साहान हि दिला आहे . कोल्हापूरने नेहमीचा कलेचा वारसा जोपासत कलेला कधीही कलंक लावू दिला नाही . परंत्य गेल्या काहि वर्षांपासून गणेश उत्सव व इतर सामाजिक उत्सव मध्ये आकर्षण व लोकांची गर्दी करण्यासाठी बाहेरील प्रांतातून व इतर जिल्हातून डान्सर मुली आणून त्या नाचवल्या जातात . त्या अश्लील चाळे व अश्लील खाणाखुणा करून बेआदा नाचत असतात .या मुली गणेश मंडळे अवाच्या सवा दाम देवून कार्यकम ,मिरवणूक करिता आनंत असतात .आपणस कार्यक्रम किवा मिरवणुकीची सुपारी द्यावी या करिता या नर्तिका आपले नृत्य चे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मिडिया पोस्ट करून त्याची जाहिरात करत असतात .यामुळे सामाजिक वातावरण दुषित होत असते .त्याचा प्रसार व प्रचार होऊ नये व गणेश मंडळांनी अशा नर्तिका आणू नये या करिता कोल्हापूर आखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांच्या वत्तीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकसो यांना निवेदन देण्यात आले
दोन दिवसावर गणेशाचे आगमन होत आहे. अशा या पवित्र सणांमध्ये कोल्हापूर जिल्हामधे अनेक मंडळे मिरवणूक ट्राॅली च्या नावावर अश्लील नृत्यु व अश्लील हावभाव करुन लोकांना भुरळ पडणार्या मुलीना कार्यक्रमाची सुपारी देत आहेत . यामुळे पारंपरिक सणाला आधुनिकतेचा जागर देत अनेक तरुण पिढी व्यसनाधीन होतं आहेत . यात्रा ,जत्रा ,उरुस ,व इंस्टाग्राम वर फेसबुक वर आपली पारंपरिक कला न दाखवता अश्लील नृत्य हावभाव करुन कोल्हापूर कलानगरीला नाव बदनाम करत आहे. तरी या गोष्टी चा विचार करुन प्रत्येक गावोगावी म़ंडाळाच्या वतीने आणण्यात येत असलेल्या डान्सर मुलीच्यावर बंदी आणावी . ज्यामुळे कोल्हापूर कलानगरीला न्याय मिळून स्वच्छ सुंदर हि कला नगरी पारंपरिक राहिल.अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे आखिल भारतीय कलाकार एकता महासंघटना च्या वतीने मागणी करण्यात आली आहे . तसेच तीव्र आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही असे निवेदनात म्हंटले आहे .
यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सौ शोभा पाटिल, सायली सावंत, अरुणा जाधव,महेश कदम , अनिल पाटील,हेमंत जोशी, रघुनाथ चौगुले,श्रुती जोशी ,पूजा या सर्व कलाकार पदाधिकारी उपस्थित होते .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.