भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे आयोजित ऑनलाइन सजावट स्पर्धा २०२४
कडवई:
गणेशोत्सवाच्या उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे तसेच संगमेश्वर उत्तर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी ऑनलाइन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश उत्सवादरम्यान शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे, नागरिकांना त्यांच्या मूर्ती आणि सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याचे आवाहन करणे हा आहे.इच्छुक स्पर्धकांनी स्वतः समवेत आपल्या घरातील सजावटीचे चार छायाचित्रे(वेगवेगळ्या अगलमध्ये) आणि १ मिनिटांचा व्हिडिओ काढून दिलेल्या वाट्सएप नंबरवर आपले संपूर्ण नाव व गावाचे नाव तसेच तालुक्याचे नाव टाकून दिनांक ७ सप्टेंबर २०२४ ते १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावेत.स्वप्नील सुर्वे (९७३०७१९१८१/७७७६९४९४०३), विनोद म्हस्के (९४२२४७७४९९), मिथुन निकम (९८३४५५३२३८), अमित ताठरले (९८९०१११११६)या नंबरवर संपर्क साधावा.त्यानंतर आलेल्या कोणत्याही स्पर्धकाला ग्राह्य धरले जाणार नाही ही नोंद घ्यावी.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक विजेत्यास ₹५५५५, द्वितीय पारितोषिक ₹३३३३ आणि तृतीय पारितोषिक ₹११११ प्राप्त होतील.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.