श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सभा खेळीमेळीत
सभासदांना १२% लाभांश :चेअरमन मिलींद कोले
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि २५ : रौप्य महोत्सवी श्री शांतीनाय पतसंस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, येथे मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली अध्यक्ष स्थानी चेअरमन मिलीय कोले होते .

सुरुवातीस भनेकर यांनी प्रास्तावीक स्वागत केले त्यानंतर मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाले. तद्नंतर संस्थेचे ज्ञात अज्ञात सभासद, विविध कारणामुळे निधन झालेले देशातील नागरीक यांच्या दुःखद निधनाबद्दल सभेत श्रध्दाजंली वाहण्यात आली. त्यानंतर मॅनेजर चंदुलाल फकीर यांनी नोटीसवरील सर्व विषयांचे वाचन केले. त्या सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिलो
संस्थेचे चेअरमन मिलीद कोले यांनी संस्थेचा अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद याचे वाचन केले व अहवाल सालात संस्थेची उलाढाल रु.१९ कोटीची झाली आहे, खेळते भांडवल रु.१० कोटी ८ लाख इतके असून वजा जाता अहवाल सालात संस्थेस निव्वळ नफा रु.१२ लाख ६३ हजार झालेला आहे. संचालक निर्णप्रमाणे या वर्षीसुध्दा सभासदांना १२% डिव्हीडंड देणार असल्याचे जाहीर केले. ग्राहकाभिमुख पारदर्शी व्यवहार व संस्थेवरील खातेदारांचा अटळ विश्वासाच्या जोरावर संस्थेने प्रगती केले असलेने या पुढेही आपल्या विश्वासाच्या जोरावर संस्था उत्तुंग भरारी घेईल असे सभेप्रसंगी ग्वाही दिली.
त्यानंतर संस्थापक मणेरेमामा यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याचाही उहापोह केला. संस्था स्थापनेपासुन गेली ४१ वर्षे संस्था नफयात सुरु असल्याचे पाहायला मिळते हे माझे भाग्य समजतो असे म्हणाले जागतीक मंदीमध्येही संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर व ऑफीस स्टॉफ यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये केलेले कार्य व दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या सभेमध्ये राजेंद्र आण्णा शेटे यांचा किलोस्कर कंपनी कडून दिला जाणारा उत्कृष्ट कास्टीग बहलचा पुरस्कार मिळालेबद्दल त्यांचा सत्कार करणेत आला. त्याच बरोबर कबनूर हायस्कूल मधील प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी कोकणे प्रणव संजय, चोथे संकेत सुनिल, सुंकनपल्ली श्रावणी राकेश व मणेरे हायस्कुल मधील प्रथम आलेले मुल्ला जुनेद बशीर, वागावकर पूर्वा कैलास, रामजगोळ साक्षी सोनल यांचे अभिनंदन करुन प्रमाणपत्र व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्हा. चेअरमन सुभाष केटकाळे, संचालक रमेश केटकाळे, ज्ञानदेव बडवे, किरण कांबळेसर, नजरुद्दीन मुजावर, आनंदा कदम, राजेंद्र शेटे, सुरेखा सुरेश केटकाळे, सिमा संजय लिगाडे, संगिता पाटील, स्वाती कोले. संजय केटकाळे, अरुण केटकाळे, तात्यासो पाटील, राजाराम बाकरेकर, विलास कुंभार, महावीर पिपळे, शांतीनाथ कोले, आण्णाप्पा चौगुले, अल्ताफ मुजावर यांच्यासह ऑफीस स्टॉफ धंनजय कोले, अशोक केटकाळे, अनिल हजारे व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.आभार किरण कांबळे सर यांनी मानले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.