शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
यड्राव; सलीम माणगावे
दि .७ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये विधी सेवा समिती हातकणंगले यांचेवतीने विद्यार्थ्यांकरिता कायदेविषयक (युथ एमपॉवरमेंट) कार्यशाळेचे आयोजन करणेत आले.यावेळी इचलकरंजीचे सह दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) बी. टी. येंगडे यांनी अँटी रॅगिंग व करिअर विषयी मार्गदर्शन केले. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सायबर क्राईम, अंमलीपदार्थ व वाहतूक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे कार्यकारणी अध्यक्ष अॅड. शहानवाज पटेल यांनी पोक्सो कायद्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रम संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी संस्थेचे प्राचार्य बी. एस. ताशीलदार, विधी सेवा समितीचे सतीश जोशी, गोपनीय पोलीस अधिकारी शशिकांत डोणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, प्राध्यापक- प्राध्यापिका, विध्यार्थी-विध्यार्थीनी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.