प्रा. संदीप व्हनाळे यांनी नेट परीक्षेत मिळवले यश

रुकडी:सलीम मुल्ला 

दि. २५”:चोकाक (ता. हातकणंगले) येथील प्रा. संदीप व्हनाळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नेट विश्वविद्यालय अनुदान आयोगामार्फत (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेत मराठी विषयातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०२४  च्या या परीक्षेत त्यांनी ९८.६६  टक्के  मिळवत हे यश मिळवले आहे.

प्रा. व्हनाळे यांना यापूर्वीही २०२३  साली झालेल्या सेट (राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) मध्ये यश मिळाले होते. सध्या ते कोल्हापूरच्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्य प्रवासात त्यांनी चार पुस्तके प्रकाशित केली आहेत, ज्यामुळे त्यांचा मराठी साहित्य क्षेत्रात विशेष ठसा उमटला आहे.

या यशासाठी प्रा. व्हनाळे यांना संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री. संजय घोडावत, विश्वस्त श्री. विनायक भोसले, संचालिका-प्राचार्या सस्मिता मोहंती, तसेच प्राचार्य श्री. अस्कर अली यांचे प्रोत्साहन मिळाले. विशेषतः डॉ. श्रीकांत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. प्रा. संदीप व्हनाळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×