शिरोळ मधून काँग्रेस कडून उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर

शिरोळ : सलीम माणगावे 

दि २६ : शिरोळ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस कडून उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली .   महाराष्ट्र  विधानसभा २०२४  निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज (दि.२६ ) रोजी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून ४८ उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.२६ )रोजी  दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे . उद्यान पंडित गणपतराव पाटील  यांना उमेदवारी मिळाल्यामुळे गणपत दादा पाटील यांच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे आणि उल्हासी वातावरण आहे .

महाआघाडीतून कोणाला तिकीट मिळणार याकडे मतदार संघाचे लक्ष लागून राहिले होते .महा आघाडी कडून उल्हास दादा पाटील  आणि  गणपत राव पाटील दादा  यांचे नवे अग्रक्रमाने होती. त्यामुळे काँग्रेस कडून दुसरी यादी जाहीर झाली यात उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्त झाल्यामुळे महाआघाडी कडून गणपत दादा पाटील हे निवड णूक लढणार हे  पक्के झाले आहे .आता त्यांच्या  विरुद्ध  महायुती कडून राजेंद्र पाटील -यड्रवकर  हे निवडणूक लावणार आहेत .त्यामुळे दोन साखर सम्राट  यांच्यात  अटीतटी  निवडणूक पहावायास मिळणार आहे .

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!