गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची उमळवाड ग्रामस्थांची ग्वाही

शिरोळ:राम आवळे 
दि .१२ : उमळवाड येथे महा महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली. तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एकदिलाने काम करून गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहतील, असा विश्वास दिला.
प्रारंभी पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कॉर्नर सभा झाली. भाऊसाहेब ठोंबरे हे कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी होते. अनिस भानुसे यांनी प्रास्ताविक केले. मारुती गायकवाड यांनी आपल्या संघटनेचा पाठिंबा गणपतराव पाटील यांना दिला. पद्माकर देशमुख, बाळ संकपाळ, पांडुरंग रजपूत यांनी गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. गणपतराव पाटील यांनीही आमदार होण्यापूर्वी आपण केलेली कामे आणि आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाची दृष्टी स्पष्ट केली. आभार किशोर चौगुले यांनी मानले
यावेळी सुदर्शन कदम, रमेश चौगुले, विजयकुमार चौगुले, शिवराज पाटील, दिलीप पाटील कोथळीकर, अजित कोले, रवींद्र चौगुले, बंडू पाटील, धनंजय पाटील, दिलीप चौगुले, देवू पाटील, योगेश पाटील, शैलेंद्र चौगुले, बाहुबली राई, रेवणजी मगदूम, महावीर चौगुले, बाबुराव मालगावे, एकनाथ पाटील, विलास कांबळे, बाबू तिवडे, प्रमोद तिवडे, शरद कांबळे, अनिल कुंभार, सतीश भंडारे, वैभव उगळे, बाजीराव मालुसरे, रमेश शिंदे, हसन देसाई, तेजपाल कांबळे, संजय चौगुले, चवगोंडा पाटील, सखाराम ठोंबरे, संदीप बिरणगे, बाजीराव कुराडे, नंदू संकपाळ, लक्ष्मण भवरे, दिलीप चौगुले, रुपाली संकपाळ, कांचन संकपाळ, आशा पाटील, संतोष नरके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×