मणेरे शिक्षण संकुलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिम्मित त्यांच्या स्मृतीस अभिवादन

कबनूर : हबीब शेखदर्जी  

दि .८ : श्री.डी..मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौकुसुमताई  बालमंदिरप्राथमिक विदयामंदिरमणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी, कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने आज दि.०६/१२/२०२४ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आयोजित  करण्यात आला.

        या प्रसंगी  संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. कॉलेज विभागातील सौ.दिपाली चौगुले व कु.प्रतिभा नराटे यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली व संस्थेचे संस्थापक श्री सुधाकररावजी मणेरे यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांची विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणे कसे गरजेचे आहे हे सांगितले.

यावेळी संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे मार्गदर्शक श्री.अशोक वसगडे सर, हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, प्राथमिक उपमुख्याध्यापिका सौ.शर्मिला माळी, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.दिपाली चौगुले यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×