समीरभाई जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड,समाजसेवकाचा गौरव
गुहागर: दिलीप जाधव
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी चिपळूण येथील थोर समाजसेवक आणि यशस्वी व्यावसायिक उद्योजक मा. समीरभाई जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूणसह संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण आहे.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स -महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17 —जाहिरातीसाठी संपर्क… सचिन पाटोळे —9922749187..नियाझ खान —9921435330..दिपक तुळसणकर —9730389876).. नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. विलासराव देसाई आणि महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. सुरेश खाडे साहेब यांच्या शुभहस्ते समीरभाई जाधव यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी मराठा महासंघाच्या अनेक मान्यवर नेत्यांनी त्यांच्या कामाची स्तुती केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समीरभाई जाधव यांनी समाजकार्यात केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल आणि त्यांच्या यशस्वी नेतृत्व क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चिपळूणसारख्या छोट्या शहरातून मोठ्या पातळीवर पोहोचून त्यांनी समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
“माझ्या या निवडीचा सन्मान माझ्या चिपळूणकर आणि कोकणातील सहकाऱ्यांना समर्पित आहे. समाजाच्या उन्नतीसाठी मी कायम झटत राहीन,” असे समीरभाई जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या निवडीमुळे मराठा महासंघाच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजातील सर्व स्तरांतील लोकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.