माभळे येथील संगमेश्वर पोलीस स्थानक आवारात दत्तजयंती उत्साहात साजरी
कडवई:
माभळे येथील संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या आवारातील श्री गणपती, साई आणि दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत महिला पोलीस अधिकारी आणि स्थानिक महिलांच्या सहभागाने श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी युवा गायिका कुमारी समीक्षा वाडकर हिने भावपूर्ण स्वरात श्री दत्त महाराजांच्या जन्माचा पाळणा गायला.
कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. माधवी भिडे, पोलीस निरीक्षक परिवार, गुप्त पोलीस अंमलदार किशोर जोयशी, पोलीस हवालदार सचिन कामेरकर, तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक अमित यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.