महालक्ष्मी टाइम्सचे नवनियुक्त पत्रकार दीपक तुळसणकर यांचा कुंभार समाज युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
आरवली:(सचिन पाटोळे)
महालक्ष्मी टाइम्स चे नवनियुक्त पत्रकार माननीय दीपक तुळसणकर यांचा कुंभार समाज युवा आघाडीच्या रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
या प्रसंगी संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रथमेश साळवी, तालुका खजिनदार गणेश साळवी, रत्नागिरी जिल्हा संघटक निलेश कुंभार, रत्नागिरी जिल्हा युवा आघाडीचे खजिनदार प्रतीक साळवी, सोशल मीडिया संगमेश्वर तालुकाध्यक्ष निलेश तुळसणकर, सोशल मीडिया उपाध्यक्ष अनिकेत साळवी, तसेच युवा आघाडी सदस्य रुपेश नाणीजकर, आलोक साळवी, अथर्व पडवेकर, योगेश तुळसणकर उपस्थित होते.
याशिवाय दैनिक पुढारी चे पत्रकार मिलिंद कडवईकर व फोटोग्राफर महेंद्र डिके यांचीही या सोहळ्यात विशेष उपस्थिती होती.
सत्कार सोहळ्यात दीपक तुळसणकर यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभकामना दिल्या आणि पत्रकारितेमध्ये त्यांचा व समाजाचा सन्मान उंचावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम कुंभार समाजातील युवा आघाडीच्या एकजुटीचा आणि त्यांच्या आदरभावनेचा प्रतीक ठरला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.