शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

आंतर राज्य स्तर स्पर्धेसाठी दोन प्रकल्पांची निवड

 यड्राव,: राम आवळे 

दि .१६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला अविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना पुरस्कार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणेरे येथे राज्य स्तरावरील स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये या दोन प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.शरद इन्स्टिटट्यु ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘अविष्कार २०२४’ च्या आंतर विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सहा विभागातून ३३५ महाविद्यालयातूनं १८६ पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.

इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सुयश पांडे, ऋतुराज पाटिल, मोहक सिदगोड़ा, महेश अवल्की यांनी ‘गतिशीलता-माइंड्सः पाल्सी, अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, कॉडा इक्विना रुग्णांसाठी एआय सशक्त स्टैंडरसह संभाव्यता सोडवणे’ हा संशोधन प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट म्हणून विजेते ठरले आहे.

तसेच अंतर्गत मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी, वैभव चौगुले, रोहन ठोमके, हर्षवर्धन कामत, हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी ‘मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा’ हा संशोधन प्रकल्प प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला  कॉडा इक्विना रूग्णांसाठी एआय सशक्त स्टैंडरसह संभाव्यता सोडवणे’ हा संशोधन प्रकल्प डॉ. सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट म्हणून विजेते ठरले आहे.

तसेच अंतर्गत मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी, वैभव चौगुले, रोहन ठोमके, हर्षवर्धन कामत, हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी ‘मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा’ हा संशोधन प्रकल्प प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्याला व्दितीय क्रमांक मिळाला.

स्पर्धेवेळी राज्यस्तरीय आविष्कारचे निमंत्रक व संघटन सचिव डॉ. संजय खोब्रागडे, संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे, डॉ. संगीता धहोत्रे, प्राचार्य डॉ. संजय खोत, परिक्षक म्हणून उर्मिला सुखदेव, डॉ. त्रिशला वाघमारे, डॉ. सुप्रिया राऊत, प्रा. कुणाल कांबळे, प्रा. अनिकेत जंगम, डॉ. दिलिप अलदार, प्रा. वर्षा गायकवाड, निरज शेठ, प्रा. तेजस महागांवकर, प्रतिमा पडघम, डॉ. सुनिता कुंभार उपस्थीत होते.

अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सचिन गुरव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. गजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल वागणे यांनी यशस्वी विद्यार्थी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×