खंडाळा येथे संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

 

गुहागर: दिलीप जाधव 

सैतवडे महाल खंडाळा येथील तेली समाजाच्या वास्तूमध्ये शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..

नियाझ खान —9921435330..

दिपक तुळसणकर —9730389876)..

नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].

या सोहळ्याचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, व सेवाआघाडीचे अध्यक्ष काशिनाथ सकपाळ यांनी दुपारी २:०० वाजता उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक अध्यक्ष गणेश झगडे, उपाध्यक्ष प्रसाद (अण्णा) झगडे, सचिव राजेंद्र रसाळ गुरुजी यांच्यासह इतर पदाधिकारी विशाल महाडीक, लक्ष्मण मोघे, प्रमोद झगडे, पंकज झगडे, जगदीश महाडीक, मनोज महाडीक, विजय रहाटे आणि अनेक समाजबंधू-भगिनींच्या उपस्थितीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली.

समाज बांधवांच्या एकत्रित चर्चेमुळे संघटनेच्या भविष्यासाठी उपयुक्त उपाययोजना ठरविण्यात आल्या. यानंतर सर्व मान्यवरांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन चार वाजता नांदळज, तालुका संगमेश्वर येथे पुढील कार्यक्रमाासाठी प्रयाण केले.कार्यक्रमाची समाप्ती समाजबांधवांच्या उत्साहपूर्ण सहभागाने आणि अभूतपूर्व चर्चेने झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×