जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट ‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ स्थापन
समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ - सहाय्यक आयुक्त दीपक घाटे
रत्नागिरी, दि. 2:
‘किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता’ हा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथीय बचत गट स्थापन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचा भक्कम पाठिंबा असेल, अशी ग्वाही सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेच्या सहकार्याने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या निमित्ताने तृतीयपंथीय समुदायासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शहर अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर, समाज संघटक सारिका मिरकर, संपदा सावंत, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, अश्फाक गारदी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
किन्नर समुदायाच्या गुरु निता केने, रेणुका चव्हाण, अनुराधा चव्हाण यांचाही या कार्यक्रमाला विशेष सहभाग होता. गटाच्या अध्यक्ष पल्लवी परब आणि माऊ कदम यांनी स्वागत केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा सावंत यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले की, “हा गट राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल. उपेक्षित असलेल्या तृतीयपंथीय समुदायाला मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी या गटाला सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाजकल्याण विभागाचा पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी व्यवसायांसाठी आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी गटाच्या अध्यक्ष पल्लवी परब यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि समाजकल्याण विभागाचे आभार मानले.हा उपक्रम तृतीयपंथीय समुदायाला स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.