डीकेटीई मध्ये ऍडव्हॉन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक आणि इंडस्ट्री ४.० अंमलबजावणी विषयावार एफडीपीचे आयोजन

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि . ०५  जानेवारीः  येथील डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये दि.०६ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत, एआयसीटीई, दिल्ली अटल ऍकेडमी द्वारा प्रायोजित, डीकेटीई मेकॅनिकल विभाग व डीकेटीई एआयसीटीई आयडिया लॅबच्या सहकार्याने ऍडव्हॉन्स मॅन्युफॅक्चरींग टेक्निक आणि इंडस्ट्री ४.० अंमलबजावणी या विषयावर एक आठवडयाची ऑनलाईन एफडीपी आयोजित केलेली आहे.
इंजिनिअरींग कॉलेजीस, विद्यापीठ, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट केंद्रातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि संशोधन अभ्यासकांना नवीनतम उत्पादन पध्दती आणि तंत्रज्ञानाचा परिचय, ऍडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग थ्री डी प्रिटींग सीएनसी तंत्रज्ञान आणि इतर अधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची सखोल माहिती इंडस्ट्री ४.० अंमलबजावणी कशी होते हा या कार्यक्रमाचा मुळ उददेश आहे. आयओटी, बीग डाटा ऍनॅलिटीक्स आणि एआय चा औद्योगिक क्षेत्रातील वापर, स्मार्ट मॅन्युफॅक्चरींग सिस्टीमस तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य, डिजीटल ट्रान्स्फरमेशन प्रक्रियेतील अव्हाने व उपाय. उदयोग आणि शिक्षण क्षेत्रामधील सामंजस्य साधण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोन सस्टेनबल मॅन्युफॅक्चरिंग आणि लिन प्रॅक्टीसेस चा अवलंब इ. चा समावेश यामध्ये असणार आहे.
हा कार्यक्रम एआयसीटीई अटल ऍकॅडमी प्रायोजित आहे. अटल एफडीपी हा एक मोठया संख्येतील निवडक प्रोग्रॅम मध्ये आहे, ज्यात प्राध्यपकांना संबोधित करण्यासाठी आयआयटी, एनआयटी, आयआयएससी, इंडस्ट्री एक्सपर्ट तसेच परदेशातील प्रतिष्टित शिक्षणतज्ञ संशोधक आमंत्रित केले आहे. तरी इच्छुक प्राध्यपकांनी या ऑनलाईन अटल एफडीपी मध्ये उपस्थित राहून त्याचे ज्ञान व कौशल्य वाढविण्याचे अवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे व मेकॅनिल विभागप्रमुख डॉ व्ही.आर.नाईक, यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. कार्यक्रमाच्या सहभागासाठी समन्वयक प्रा डॉ.पी.एस.बाडकर – ८६००४७०५०५, प्रा.एस.बी. रायजाधव – ८३२९१२९३०६ यांचेशी संपर्क साधावा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×