संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालख-मालक संघटनेची बिनविरोध निवड पुर्ण
संगमेश्वर, दि. 06 (नियाज खान):
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. जाखमाता मंदिर, संगमेश्वर येथे आयोजित सभेत 80 रेशन दुकान चालक आणि मालकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
सभेची सुरुवात श्री रोशन शिंदे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, जिथे त्यांनी या सभेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. जेष्ठ दुकान चालक श्री गंगाधर पंडित यांनी सभेच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली.
सदर सभेत दुकानदारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शासन व प्रशासन स्तरावर उपाययोजना करणे, संघटना सक्षमीकरण, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन व अंमलबजावणी, तसेच ग्राहकांप्रती दुकानदारांची कर्तव्ये या विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली.
रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी विशेष उपस्थिती लावून सभेला मार्गदर्शन केले. त्यांनी शासन स्तरावर दुकानदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
सर्वानुमते कार्यकारिणी बदलाचा निर्णय घेण्यात आला. निवड झालेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.अध्यक्षपदी श्री रोशन शिंदे (संगमेश्वर)यांची निवड करण्यात आली,उपाध्यक्ष श्री अतुल शिंदे (साखरपा-भडकंबा), श्री विनायक गुरव (तुरळ),सचिव: श्री शंतनू शेट्ये (संगमेश्वर),खजिनदार: श्री संतोष खातू (संगमेश्वर),कार्यकारिणी सदस्य श्री नंदन भागवत (सरंद), श्री कल्पेश शिंदे (देवळे), श्री शरद सावरटकर (तुरळ), श्री विलास ओकटे (कडवई), श्री महंमद शेठ दसुरकर (कळंबसते), श्री विलास सावंत (देवरुख), श्रीमती साधना सुर्वे (कडवई), सौ. नम्रता कांबळे (चोरवणे),सल्लागार श्री गंगाधर पंडित (चिखली), श्री लक्ष्मण पाचकले (मानसकोंड), श्री मधुकर माने (साखरपा)यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सदस्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी केले. त्यांनी संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.सभेच्या शेवटी श्री रोशन शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता केली. संपूर्ण सभा शांततामय वातावरणात पार पडली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.