श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना “न्याय प्रभात शिक्षक रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
कडवई:दिपक तुळसणकर
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आणि मासिक *”न्यायप्रभात”* वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. याच उपक्रमांतर्गत दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई येथील सह-शिक्षिका आणि अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य महिला शाखेच्या सह-सचिव श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना *”न्यायप्रभात शिक्षकरत्न”* राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
समारंभाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायप्रभात वृत्तपत्राचे संपादक श्री शिवाजी खैरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम गेल्या २४ वर्षांपासून महाराष्ट्र उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथे सह-शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रगती साधली आहे.
श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना यापूर्वी रत्नागिरी जिल्हास्तरीय *”स्वयंसिद्धा महिला”* आणि मानवाधिकार सुरक्षा परिषद, नवी मुंबई यांच्या वतीने *”राज्यस्तरीय आदर्श गुरुजन”* पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
न्यायप्रभात शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष श्री. सादीक काजी, उपाध्यक्ष डॉ. अन्सार जुवळे, मुख्याध्यापक श्री. रिजवान कारीगर, कडवई इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री. प्रांजल मोहिते, तसेच अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक श्री. साजीद निसार सर आणि पंचक्रोशीतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नर्गिस तुळवे मॅडम यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि त्यांच्या विद्यार्थ्यांवरील सकारात्मक प्रभावामुळे त्यांचा हा सन्मान संपूर्ण कडवई परिसरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.