आई निनावी लोवले संघाने पटकावला एकता क्रीडा मंडळ आयोजित ३५ वा कबड्डी स्पर्धेचा चषक
कडवई:
एकता क्रीडा मंडळ, करंबेळे आयोजित कै. अनंत रावजी मोरे स्मरणार्थ भव्य कबड्डी स्पर्धेत आई निनावी देवी लोवले संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला दिलीप मोरे यांच्यांकडून देण्यात आलेला चषक व रु. ७,०३५/- चे रोख बक्षीस देण्यात आले. जाधववाडी मांभळे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघाला रु. ५,०३५/- व द्वितीय क्रमांकाचा चषक देण्यात आला. तृतीय क्रमांक वाघजाई तेऱ्ये संघाने मिळवला असून त्यांना रु. ३,०३५/- व तृतीय क्रमांकाचा चषक श्री. सागर शेंडगे, कोल्हापूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
बक्षीस वितरण सोहळा रोहनजी बने, तालुका प्रमुख बंड्या बोरुकर, जनक शेठ जागुष्टे, पप्पू नाखरेकर, संदेश शिवलकर, सागर शेंडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. माजी आमदार सुभाष बने यांनी मंडळाला धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्या, तर श्री. प्रशांत यादव यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंडळाचे संस्थापक उदय पवार, रवी पवार, अध्यक्ष बाबू पवार, सल्लागार बंड्या पवार, नितीन (उर्फ पांड्या) पवार, काशिनाथ पांचाळ, दीपक म्हस्के, अरविंद नलावडे, आनंद पानगले, मकरंद पांचाळ, बंटी महाडिक, प्रवीण पवार, बाळा पवार, धीरज पांचाळ, सुरेश खाके, गावकर दीपक देवळे, संतोष देवळे, माजी सरपंच गंगाराम देवळे तसेच क्षितिज, सोहम, अथर्व, ध्रुव पवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन श्री. रवी पवार व नितीन पवार यांनी केले. मंडळाचे संस्थापक श्री. उदय पवार यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करत, मंडळाची एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले व स्पर्धेचा समारोप जाहीर केला.३५ व्या कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे एकता क्रीडा मंडळाने गावातील क्रीडाप्रेमींना एकत्र आणत क्रीडा व संस्कृतीच्या एकत्रित प्रवाहाला प्रोत्साहन दिले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.