डीकेटीईमध्ये इस्त्रो आणि विज्ञान भारतीच्या संयुक्त विद्यमानाने आउटरिच प्रोग्रम संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि .१० : जानेवारीः डीकेटीईमध्ये राष्ट्रीय रिमोट सेंन्सिंग केंद्र (एनआएससी), हैद्राबाद आउटरिच फॅसिलीटीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आउटरिच प्रोग्रॅम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डॉ आर. श्रीनिवास एसपीओडी-टीईओजी प्रमुख यांनी इस्त्रोची संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी त्यांनी इस्त्रोच्या यशस्वी मोहिम, प्रेक्षपण वाहने, उपग्रहांची माहिती उदा. भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह, कम्युनिकेएशन सॅटेलाईट, नेव्हीगेएशन सॅटेलाईट आणि त्यांचे विविध उपयोग याबददल विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये डॉ श्रीनिवास यांनी इस्त्रोमधील करिअर संधी, स्टार्टअप, आणि इंडस्ट्री सुरु करण्याबददल मोलाचे मार्गदर्शन केले . यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित या क्षेत्रांबददल बहुमुल्य मागदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली. यावेळी डॉ श्रीनिवास व विद्यार्थी यांचेमध्ये इस्त्रोमधील विविध विषयांवर उहापोह झाला आणि विद्यार्थ्यांचे विविध शंकाचे निरासन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबददल प्रेरणा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे भावी आयुष्यात या मार्गदर्शनाचा त्यांना निश्‍चितच लाभ होईल असा विश्‍वास विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला.
विज्ञान भारतीचे श्रीप्रसाद यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन संशोधनाची माहिती दिली. विलिंग्डन कॉलेजचे माजी उपप्राचार्य डॉ एस.जी.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता यामध्ये विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या भविष्यकालिन मोहिम आणि संशोधनाबददल अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या अयोजनाबददल विद्यार्थ्यांच्यातून समाधन व्यक्त होत होते.
संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर डायरेक्टर डॉ एल.एस. आडमुठे यांनी भविष्यात असे कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी विविध विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.एस.के.शिरगावे डीन ऍकेडमिक्स यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×