महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या नूतन प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा (I.A.S.) यांनीमहाराष्ट्रातील सहकारी सूतगिरणी यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी 

दि .२६ : महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या नूतन प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा (I.A.S.) यांनी बेलार्ड इस्टेट मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यालयात महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरणी यांचे चेअरमन, कार्यकारी संचालक व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शक्य ते सर्व सहकार्य सहकारी सूतगिरण्यांना, सहकारी यंत्रमाग संस्थांना व खाजगी यंत्रमाग धारकांना तसेच वस्त्रोगातील इतर घटकांना करण्याचे आश्वासन त्यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिले.

तसेच वस्त्रोद्योगातील सर्व घटकांची निर्मितीची श्रीमती अंशू सिन्हा यांनी बारकाईने माहिती घेतली. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी यावेळी नूतन प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार कुणाल पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, मुंबई विभागाचे आरडीसी दीपक खांडेकर,महासंघाच्या उपाध्यक्ष श्रीमती सविता सोनखेडकर गायकवाड, शासनाचे इतर अधिकारी व महासंघाचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×