दि मॉडेल इंग्लिश स्कूल ,सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

रत्नागिरी : नियाझ खान 
दि .२९ : जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत दि मॉडेल संघाच्या संघाने आघाडी घेवुन चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर धडक दिली आहे.यामध्ये कु. प्रिया मंदार अजगोलकर, कु. अंतरा अनंत वरवटकर, कु. रिया कैलास पावसकर व कु. नंदीनी रवींद्र जाधव या खेळाडूंचा समावेश झाला आहे.दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनी आता नँशनल डॉजबॉल संघातून खेळणार ही अत्यंत जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे.
          सैतवडे सारख्या लहान गावातून अनेक अडचणीवर मात करत संघात आपल्या चार विद्यार्थीनिची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. या आणि सर्वच मुलींच्या संघानी आपल्या शाळेचे, आपल्या आई वडीलांचे तसेच आपल्या गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि विशेष म्हणजे या संघाच्या कोच शाळेच्या शिक्षिका श्रीमती ऋतुजा राजेश जाधव  यांची विशेष मेहनत दाद घेण्यासारखीच आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास कोळेकर सर यांचे या संघाला विशेष सहकार्य लाभले. तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा चांगले प्रोत्साहन लाभले आहे.या संघाचे व यशस्वी मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!