इंडो इंग्लिश हायस्कूल चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

कबनूर: हबीब शेखदर्जी 

दि .२८ : येथील स्वातंत्र्यवीर निजामुदिन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी संचलित इंडो इंग्लिश हायस्कूल कबनूर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा स्पर्धेचे व शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस समारंभ वितरण सोहळा प्रमुखपाहुणे माननीय श्री. दिलीप विष्णू साळुंखे (सीनियर ऑफिसर इंडियन आर्मी) यांच्या हस्ते करण्यात आले 

सुवर्णपदक ,रौप्य पदक, कास्यपदक ,प्रमाणपत्र असे पारितोषिकेचे स्वरूप होते तर क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. माननीय श्री राजू अजगर, डॉक्टर श्री. असिफ फकीर ,श्री. गौस जमादार ,श्री .अल्तमस बिच्छू, श्री .नासीर फकीर ,श्री. जमीर सुतार ,श्री .जावेद जमादार ,श्री. इम्रान पेंढारी यावेळी हे मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. शहानुर कमालशा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका नाजीया नवाब यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग यशाचे महत्व याबाबत प्रोत्साहितपर माहिती सांगितली . विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री .महेश पारसे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास शाळेचे सेक्रेटरी समीरा पिरजादे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ संगीता जिरगे यांनी केले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×