स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांना श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने अभिवादन
शिरोळ: राम आवळे
दि १३: श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. विश्वासराव घोरपडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक, स्व. सा. रे. पाटील यांच्या पुतळ्यास चेअरमन रघुनाथ पाटील स्व. दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुतळ्यास संचालक इंद्रजित पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच, उपस्थित सर्व संचालक, मान्यवर व कर्मचारी वर्गाने पुष्पकमल अर्पण करून आपल्या आदरभावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या अभिवादन कार्यक्रमास श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगु गावडे, सुरेश कांबळे, विजय सूर्यवंशी, प्रदीप बनगे, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, सिव्हील इंजिनीयर एल. पी. पाटील, यशवंतराव माने, परचेस ऑफिसर व्ही. टी. माळी, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, स्टोअर्स कीपर एस. व्ही. शिंदे, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, ऊर्जा विभागाचे व्यवस्थापक व्ही. आर. इंगळे यांसह कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त भांडार या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या दूरदृष्टीमुळे श्री दत्त साखर कारखाना उभारला गेला आणि त्याने शेतकरी, कामगार व उद्योजकांना संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे स्मरण केले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.