डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२५’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य आयोजन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २० फेब्रुवारी – डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडन्ट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२५ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेने विद्यार्थ्यांना टेक्स्टाईल क्षेत्रातील नवीन संधी आणि आव्हानांचा सामना करण्याची संधी दिली, तसेच त्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे सादरीकरण करण्याचा एक उत्तम मंच उपलब्ध केला.
ही स्पर्धा गेली २७ वर्षांपासून डीकेटीईमध्ये आयोजित केली जात आहे. यावर्षीच्या स्पर्धेची थीम ‘स्मार्ट टेक्स्टाईल रिव्हॉल्यूएश : मटेरियल्स, मशीन्स आणि मेथड्स रिडिफाइंड’ होती. या थीममध्ये डिझाईन कलेक्शन व प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, आय ऑन पिक ग्लास व स्टार्टेक्स ६.० अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. ओडिसा, तमिळनाडू, बेंगलोर, मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, संभाजीनगर, तासगाव इत्यादी ठिकाणांहून सुमारे २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
स्पर्धेच्या आयोजनाने संपूर्ण राजवाडा परिसर विद्यार्थ्यांच्या वस्त्रोद्योगातील आधुनिक कल्पकतेने सजवला होता. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेच्या संचालिका डॉ. एल.एस. अडमुठे यांनी स्वागतपर भाषणात डीकेटीईच्या प्रगतीचा आलेख मांडला आणि विद्यार्थ्यांना नवनविन गोष्टी एक्स्प्लोर, एक्सपेरिमेंट आणि इन्व्होवेट करण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन.डी. म्हात्रे, मॅनेजिंग डायरेक्टर, इटमा आणि अंजन प्रियदर्शनी, एचआर, सागर मॅन्युफॅक्चरींग प्रा.लि. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एन.डी. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याचे आणि भविष्याच्या दृष्टीने समाजाला काहीतरी देण्याची भावना मनात ठेवण्याचे आवाहन केले.
आर संपत, प्रेसिडंट टायमु यांनी टेक्स्टाईल असोसिएशनच्या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रथमेश सारडा, टायमु प्रेसिडंट यांनी टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा स्पर्धेची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे संयोजक आर.एच. देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, उपसंचालक प्रा.डॉ. यु.जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. दिपक दोडिया, स्वप्निल लाटे, प्रियंका मगदूम, निलेश यादव, भालचंद्र बक्षी, स्वप्निल देशमुख यांनी परिक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. व्ही.के. ढंगे यांनी केले.
या कार्यक्रमात टायमु सचिव डॉ. एस.एस. लवटे यांच्यासह सर्व कोर्स कोर्डिनेटर, प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.