अरुण विद्यामंदिर, संग्राम बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२५:अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी “शिव छत्रपती जागर आणि सांस्कृतिक” या विषयावर कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांनी भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. स्नेहसंमेलन केवळ नाट्य आणि नृत्याचा आविष्कार न राहता विचारांचे संमेलन ठरले. कार्यक्रमाने अंतर्मुख करणारा प्रभाव टाकला, असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तसेच, संस्थेस भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुगावकर (अध्यक्ष, वीर माहेश्वरी समाज, पुणे), श्रीकांत स्वामी (उद्योगपती, लातूर), जगदीश स्वामी (अध्यक्ष, नर्मदा ट्रॅव्हल्स ग्रुप, लातूर), अँड. सौ. अलका स्वामी (माजी नगराध्यक्षा, इचलकरंजी नगरपालिका), वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी तसेच दिलीप मुथा, युवराज माळी, विजय गलगले, धनराज खंडेलवाल, सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे, चंद्रकांत बडवे, राहुल जानवेकर, कुमार माळी, सुवर्णा स्वामी, बाबासो कितुरे, नागेश पाटील, उमाकांत दाभोळे, सारिका बांगड, पुष्पा लड्डा, राजाराम तोडकर, अरुण बंडगर, अविनाश वेदांते, युवराज शहा, मारुती वीर, रवी माळी, सचिन देशमाने, शिवम केसरवाणी, सलीम शिकलगार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा व लिंबू-चमचा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी महिला पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले.या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रेरणा मिळाली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.