गोकुळच्या विकासासाठी नवे निर्णय – आमदार सतेज पाटील

कोल्हापूर,: प्रतिनिधी 

दि२५ फेब्रुवारी: गोकुळ दूध संघाच्या विकासासाठी आणि शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून, संघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संघाच्या विस्तार, दुग्ध उत्पादन वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक योजनांबाबत चर्चा करण्यात आली. संघाच्या भविष्यासाठी विविध सकारात्मक उपक्रम हाती घेण्याचे ठरले.

संघाच्या विकास धोरणांबाबत महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले. संघाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकरी हितासाठी अधिक तळमळीने कार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×