शरद पॉलिटेस्ऩिकमध्ये शनिवारी ‘टेक्नोक्रॅट २०२५’ स्पर्धा
यड्राव,:राम आवळे
दि:-9: यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट २०२५ हि राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धा शनिवार (ता.१२) एप्रिल रोजी होणार आहे. स्पर्धेचे उदघाटन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते होणार आहे.
यामध्ये मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेकट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन, इलेकट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर, अॅटोमेशन रोबोटीक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टीफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड मशिन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स या विभागांची प्रोजेक्ट स्पर्धा होणार आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण १ लाख रुपयेपेक्षा अधिक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना टेक्निकल कौशल्य व ज्ञान अवगत व्हावे. याच्यामाध्यमातून नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावे. नवउदयोजक विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमठवावेत, यासाठी शरद पॉलिटेक्निकलने स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. प्रत्येकवर्षी या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रासह देशभरातून या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.