कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .१० : इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने नितीनोत्सव अंतर्गत महाआरोग्य शिबीरात पहिल्या दिवशी रक्तदान शिबीर, मुलींना एचपीवी लसीकरण, वृक्षारोपण आणि अनाथाश्रमात जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
१० एप्रिल हा कै. नितीन जांभळे यांचा वाढदिवस यंदा नितीनोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने नितीन जांभळे फौंडेशन व राष्ट्रवादी काँग‘ेस पार्टी यांच्या वतीने दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळी अशोका हायस्कुल येथे माजी आमदार अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, लतिफ गैबान, अमित गाताडे व मान्यवरांच्या हस्ते कै. नितीन जांभळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शिबीराची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग‘ेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, कार्याध्यक्ष अनिलराव साळुंखे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. दिवसभरात १५१ दात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबीरासाठी एम.एस.आय. ब्लड बँक सांगली यांचे सहकार्य लाभले.
स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी सुमारे ३०० मुलींना हसन मुश्रीफ फौंडेशन कागल यांच्या सौजन्याने एचपीवी लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर अशोका हायस्कुल प्रशालेच्या आवारात राष्ट्रवादी काँग‘ेस पार्टीच्या वतीने मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर अनाथ आश्रमातील मुलांसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या शिबीरास तानाजी पोवार, बादशहा बागवान, रवी माने, रवी रजपुते, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, उदय लोखंडे, भाऊसो आवळे, चंदूर उपसरपंच सौ. स्वाती कदम, निलेश भोसले, आनंदा उदाळे, उदय पाटील, रणजित अनुसे, दिलीप मुथा, प्रमोद पाटील, मिश्रीलाल जाजू, महादेव गौड, परवेझ गैबान, राजू चव्हाण, राजू बोंद्रे, निलेश पवार, यासीन मुजावर, सावकार गोसावी, अभिजित पटवा, विजय राठोड, वसंतनाना पाटील, सौ. प्रिया बेडगे, बानुबी पठाण, संपदा खाडे यांच्यासह डेक्कन फेरीवाला संघटना सदस्य, मराठा मंडळ पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग‘ेस पार्टीचे पदाधिकारी आदींसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
शुक‘वारी (११ एप्रिल) महाआरोग्य शिबीरात एचबीसीबीसी, शुगर, कॅल्शियम, थायरॉईडस कि‘एटिनिन व एचआयव्ही आदी चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. तसेच मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात येणार असून परिसरातील रुग्ण आणि नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फौंडेशनच्या वतीने सुहास जांभळे यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.