नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी करा :रितुराज पाटील
शरद इन्स्टिट्युट इनोव्हेशन २के२५ स्पर्धा : २५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
यड्राव: राम आवळे
दि .१४ : विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर विकासात्मक कामासाठी, नवीन निर्मिती करण्यासाठी करायला हवे. एआय हे एक उपयुक्त तंत्रज्ञान असून त्याचा आपल्या कामात वापर करुन फायदा करुन घ्या. त्याचा दुरुरयोग कराल तर अडचण निर्माण होईल. इनोव्हेशनसारख्या स्पर्धेच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक ज्ञान व कौशल्य जगासमोर सादर करण्याची संधी मिळत असते. महाविद्यालयाने तुम्हाला व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. याचा प्रत्येक विद्यार्थ्याने फायदा घ्यावा. असे प्रतिपादन मौरीटेकचे असोसिएट डायरेक्टर रितुराज पाटील यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इनोव्हेशन २के२५ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
यावेळी अनिल बागणे म्हणाले, या स्पर्धेच्या जगात आपण पुढे जायायचे असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. हि स्पर्धा म्हणजे आत्मविश्वास निर्माण करायचे व्यासपीठ आहे. कौशल्य, ज्ञान व संस्कार या सर्वांचा मेळ घालून तुम्ही ह्या जगासमोर जावा, तुम्हाला नक्की यश मिळेल.यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातून ४० महाविद्यालयातील अडिच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
सिव्हील- फिल्ड मास्टर, मेकॅनिकल- कॅड मॉडेलिंग, इलेक्ट्रॉनिक्स- स्टार्टअप मेला, स्व्केड गेम थ्रीवीझ, इलेक्ट्रीकल- टायलेंट हंट, गेट प्लेस, मेकॅट्रॉनिक्स- ब्रेक अॅण्ड बिल्ड चॅलेंज, आय.क्यु क्लॅश, अॅटोमेशन रोबोटीक्स- इ कॅडमॅनिया, रोबो सोकर, रोबो रेस, कॉम्प्युटर सायन्स- जावा मास्टर, टेक नॅरेट, इंटेलेक्ट अरेना, ए.आय.-आयडिया प्रेझेंटेशन, मॉक इंटर्व्यु, कोडिंग विथ टिमवर्क, प्रथमवर्ष- कार्पोरेट विकी, डिबेट, पोस्टर प्रेजेन्टेंशन यासह सर्व विभागात पेपर प्रेझेंटेशनसह २६ स्पर्धा झाल्या.
प्राचार्य डॉ.एस.ए.खोत यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचे समन्वय प्रा. शारदा साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन विधी फराटे, श्रध्दा लठ्ठे यांनी केले. आभार प्रा. पी.एम. स्वामी यांनी मानले. यावेळी सर्व डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थीत होते. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.