भैरवगड’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ
कडवई:
सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, रातांबी (राजिवली) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी ‘भैरवगड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
पुस्तकाचे प्रकाशन महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया टाइम्स’चे समूह/संस्थापक संपादक श्रीमान फिरोज शेख यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. सूर्यकांत साळुंके हे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित राहणार आहेत:
श्री. सहदेव बेटकर, जिल्हा संपर्क प्रमुख, उबाठा
मा. सुरेश भाईजे, अध्यक्ष – बहुजन विकास आघाडी व राष्ट्रीय उपाध्यक्ष – बळीराज सेना
मा. श्री. संतोष थेराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
प्रमुख उपस्थितीमध्ये सहभागी होणारे मान्यवर:
मा. श्री. नितीन लोकम, अध्यक्ष – बळीराज सेना, संगमेश्वर तालुका
मा. श्री. शरदचंद्र गिते, अध्यक्ष – कुणबी समाज उन्नती संघ, शाखा ता. संगमेश्वर
मा. श्री. कृष्णाजी हरेकर, माजी अध्यक्ष – ओबीसी संघटना, संगमेश्वर तालुका
मा. श्री. दत्ताराम लांबे, अध्यक्ष – कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, संगमेश्वर (आंबेड खुद)
मा. श्री. नारायण भुरावणे, माजी उपसभापती
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. सचिन पाटोळे वाढदिवस गौरव समिती यांनी अत्यंत भव्य व उत्साहपूर्ण पद्धतीने केले असून, या प्रसंगी श्री. पाटोळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच ‘भैरवगड’ पुस्तकाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमास सांस्कृतिक आणि साहित्यिक स्वरूप प्राप्त होणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.