शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्का जाम आंदोलन
अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय
शिरोळ: राम आवळे
दि .१५: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 18 मे रोजी अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून, सर्व नागरिकांनी त्यांच्या वाहन गाड्यांच्या ताफ्यासह आंदोलन स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.श्री दत्त कारखाना कार्यस्थळावरील सांस्कृतिक सभागृहामध्ये ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.
प्रारंभी श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. जनतेने अलमट्टी धरण उंची वाढप्रश्नी जिद्दीने आणि चिकाटीने विरोध करायचा आहे. खुल्या मनाने सर्वांनी एकत्र येऊन सरकारला जाग येईल असे आंदोलन करण्याचे आवाहन केले. माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी २००५ सालापासून आलेल्या महापुराची कारणे कोणती आहेत? याचे उत्तर तज्ञांनी व सरकारने देणे आवश्यक असून महापुराने नुकसान होताच कामा नये असा अंतिम लढा देण्यासाठी जाती-धर्म, पक्षीय पातळी पासून दूर राहून एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन केले. रजनीताई मगदूम, सावकर मादनाईक, सुनील इनामदार, रावसाहेब आलासे, वैभव उगळे, बाबासाहेब नदाफ, धनाजी चुडमुंगे, सर्जेराव पवार, सर्जेराव पाटील आदींनी महापुराच्या कारणा संदर्भात सरकारने तत्काळ अभ्यास करून महापूर येणार नाही आणि अलमट्टीची उंची वाढू नये यासाठी शासकीय व न्याय मार्गाने काम करण्याची गरज असलेचे सांगितले व या प्रश्नावर सर्वांची एकजूट असल्याचे स्पष्ट केले. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी अमरसिंह पाटील, चंगेजखान पठाण, महेंद्र बागे, दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, शरदचंद्र पाठक, रमेश शिंदे, दिगंबर सकट, अरुणकुमार देसाई, शेखर पाटील, अशोकराव कोळेकर, विश्वास बालिघाटे, धनाजी पाटील नरदेकर, शैलेश आडके, आदम मुजावर, किरण भोसले, अरविंद धरणगुत्तीकर, चंद्रकांत जाधव घुणकीकर, रामचंद्र शिंदे, दिनेश कांबळे यांच्यासह दत्तचे सर्व संचालक, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.