इचलकरंजी शहरातील उद्योजक प्रदीप धुत्रे यांच्या कडून सैनिक कल्याण निधीमध्ये रुपये 33333/- जमा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१५ : इचलकरंजीतील युवा उद्योजक प्रदीप धुत्रे यांनी आपल्या दि.१५ मे रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सैनिक कल्याण निधी मध्ये रक्कम रू ३३,३३३/- इतकी जमा करणेचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने सदर रकमेचा धनादेश इचलकरंजी महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडे सुपुर्द करणेत आला.
प्रदीप धुत्रे हे नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. तसेच भारतीय जनता पक्ष आणि वंदे मातरम युथ फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी विविध शिबीरे आयोजित केलेली आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटात देखील त्यांनी व त्यांच्या सहकारी यांनी चांगले कार्य केलेले आहे.नुकत्याच झालेल्या पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर द्वारे यशस्वी प्रतिउत्तर दिले तसेच यावेळी भारतीय लष्करातील काही सैनिक शहिद झाले आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता भारतीय लष्कारील जवान देशसेवा बजावत असतात म्हणून एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रदिप धुत्रे यांनी सैनिक कल्याण निधी मध्ये सदर रक्कम जमा केलेली आहे.
आयुक्त यांचेमार्फत सदर धनादेश मा.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सैनिक कार्यालय, कोल्हापूर यांचेकडे सुपुर्द करणेत येणार आहे.यावेळी उपायुक्त नंदू परळकर, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी उपनगराध्यक्ष महावीर जैन, राजेंद्र रानभरे , रसिक दायमा आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.