श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवारी संपन्न होणार

कडवई:(दिपक तुळसणकर)

श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. १८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे, तसेच “भक्तनिवास” या नूतन वास्तुचा उद्घाटन सोहळा मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब (उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य / पालकमंत्री रानागिरी जिल्हा), मा. श्री. शेखरजी निकम साहेब (आमदार चिपळूण संगमेश्वर), मा. श्री. किरणजी सामंत साहेब (आमदार लांजा राजापूर), मा. श्री. विनायकजी राऊत साहेब (माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग), मा. श्री. सदानंदजी चव्हाण साहेब (माजी आमदार / शिवसेना उपनेते), व मा. श्री. सिध्देशजी ब्रीद साहेब (युवा उद्योजक / समाजसेवक) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी या शुभप्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तीर्थ प्रसादाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

आपले नम्र

सर्व मानकरी व ट्रस्टचे सर्व पदाधिकारी श्री वरदानदेवी देवस्थान ट्रस्ट, कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी

कार्यक्रम

सकाळी ०८.०० वा. महाअभिषेक

सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा

दुपारी १२.०० ते ०१.०० वा. भक्तनिवास या नूतन वास्तुचे उद्घाटन व मान्यवरांचा सत्कार सोहळा

दुपारी ०१.०० ते ०३.०० वा महाप्रसाद

08.00 ते 09.00 p.m. भजन – विश्वकर्मा भजन मंडळ, सुतार वाडी – कडवई.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×