कडवई गावातील महिलेच्या निघृण हत्येप्रकरणी पोलिसांकडे कठोर कारवाईची ग्रामस्थांकडून मागणी
कडवई, दि. २७ मे —
कडवई गावात घडलेल्या एका निघृण हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बानू फ. मोहम्मद जूवळे या महिलेला अमानुष पद्धतीने ठार मारल्याच्या प्रकरणी ग्रामस्थ व महिलांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या भयानक घटनेत रिझवान महामूद जूवळे, हुमायू शकील काझी व हाजीरा माखजनकर या आरोपींचा सहभाग असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या तिघांविरुद्ध जलदगतीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना कोणत्याही प्रकारचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये आणि न्यायालयात त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी पुरावे सादर करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या मागणीला समर्थन म्हणून ग्रामस्थांनी दोन महत्वाचे पुरावे संलग्न केले आहेत:
1. कडवई गावातील महिलांनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनांच्या प्रतींचा संच
2. ऑनलाईन गूगल फॉर्मद्वारे मिळालेल्या ग्रामस्थांच्या पाठिंब्याचा अहवाल
गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाला आवाहन केले आहे की, या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित व निर्णायक पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल व सामान्य नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनावरील विश्वास कायम राहील.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.