रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळातर्फे शालेय साहित्याचे वाटप
संगमेश्वर– दीपक तुळसणकर
दि .२५ : सांगमेश्वर तालुक्यातील रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळ (रजि.), सांताक्रूज – मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. कोकणातील संगमेश्वर, कनकाडी, दाभोळे या विविध शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
रामपेठ अंगणवाडीतील कार्यक्रमात सेविका पल्लवी शेरे यांनी मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शेरे, साई मंडळाचे सेक्रेटरी सतीश सावंत, खजिनदार नरेश सुवरे आणि सुवरे मॅडम यांचेही मदतनिस शीतल अंब्रे यांनी स्वागत केले.
या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील पंधरा मुलांना वह्या, पेन, रंगवही, तक्ते यांसारख्या शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना खाऊही देण्यात आला. उपक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार व कायदा साथी यांनी विशेष प्रयत्न करून मुंबई येथील मंडळाशी संपर्क साधला आणि हा उपक्रम साकार केला.कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून अंगणवाडीला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शीतल अंब्रे यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.