PHC कडवई येथे टी.बी. मुक्त आरोग्य मोहीम उत्साहात राबवली

संगमेश्वर: दीपक तुळसंणकर 

दि .२६:कडवई (ता. संगमेश्वर) : प्राथमिक आरोग्य केंद्र, कडवई यांच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य मोहीम दिनांक २८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या विशेष मोहिमेचे आयोजन डॉ. पाटोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यक्रमास जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. वाय. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मोहिमेद्वारे टी.बी. रोगासंबंधी जनजागृती करण्यात आली तसेच संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. नागरिकांची मोफत आरोग्य तपासणीही करण्यात आली. यात ईसीजी, रक्तदाब तपासणी, श्वसन तपासणी अशा विविध तपासण्यांचा समावेश होता. कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. एकूण १५१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. उपस्थितांना विविध आरोग्यविषयक सल्ला व माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी PHC कडवई येथील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. तालुका आरोग्य अधिकारी व कडवई ग्रामपंचायत यांच्यासह कडवई परिसरातील ग्रामस्थ यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पाटोळे मॅडम, डॉ. एस. वाय. यादव व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे उपस्थित नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×