ब्राऊन शुगर” बाळगणाऱ्या तरुणास रत्नागिरीत अटक

निक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी: नियाझ खान 

दि. –२८: रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीवर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम राबवली असून, या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून एका तरुणास ताब्यात घेतले आहे.मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती यशश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून २०२५ रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांचे पथक माळनाका ते एस.टी. कॉलनी रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एका इसमाची संशयास्पद हालचाल निदर्शनास आली. सदर व्यक्ती मोटरसायकलवर बसून काहीतरी हालचाली करत होती. पोलिसांनी पंचासमक्ष चौकशी केली असता, त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ब्राऊन शुगर टिकीसदृश अमली पदार्थाच्या एकूण 88 पुड्या आढळल्या, ज्यांचे एकूण वजन सुमारे ८ ग्रॅम इतके होते.

या कारवाईत आरोपी अद्वैत संदेश चवंडे (वय २३, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी)याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ₹४४०००- किमतीचा ब्राऊन शुगर व एकूण ₹१४४०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संपूर्ण कारवाई पुढील अधिकाऱ्यांनी केली  पो.उपनिरीक्षक श्री. शेषराव जाधव स.पो.फौजदार श्री. सुरेश पागणे पो.हवा. श्री. शांताराम झोरे पो.हवा. श्री. बाळू पालकर पो.हवा. श्री. अनमोल कदम पो.हवा. श्री. गणेश सावंत पो.हवा. श्री. प्रवीण खांबे पो.हवा. श्री. सत्यजीत दरेकर आरोपीस व जप्त मुद्देमालास पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×