महापालिका वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व कर्मचाऱ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिर संपन्न

इचलकरंजी,:अन्वर मुल्ला

दि.२७ – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर तसेच दंत चिकित्सा शिबिर शहरवासीय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेण्यात आले.या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर आणि सहायक आयुक्त विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) यांच्या सहकार्याने घेण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. एम.ए. बोरगावे होते. या शिबिरात डॉ. एस.पी. मर्दा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, डॉ. सॅम्युएल भंडारे, डॉ. श्रीमती कोळी, डॉ. संचित काजवे, डॉ. मगदुम, डॉ. ए.के. चौगुले, ई.एस.आय. रुग्णालयाचे डॉ. जावडेकर आणि MAIचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव यांनी तपासणी सेवा दिली. या शिबिराचा लाभ १०३ नागरिकांनी घेतला.

दरम्यान, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दंत चिकित्सक डॉ. अभिषेक मोरे (MDS) आणि डॉ. किरण मोरे (MDS) यांच्या सहकार्याने घेण्यात आले. जवळपास १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×