अनिल बागणे यांच्या वाढदिनी ६१०० झाडांचे वृक्षारोपण
विद्यार्थी, शिक्षकांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात उपक्रम
यड्राव:राम आवळे
दि ३० : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या वाढदिवस कोल्हापूर, सांगली व सीमा भागातील अनेक गावात ६१०० झाडांचे वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. शरद शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून हा सामाजिक उपक्रम राबविला.
उद्योजक श्री. बागणे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेकडून प्रत्येकवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी विद्यार्थी व सर्व स्टाफने महावृक्षारोपण केले. यामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या गावात, घराच्या परिसरात, सार्वजनिक जागेत व शेतात वृक्षारोपण केले.
तसेच स्टाफ व विद्यार्थ्यांनी मजले येथील डोंगरातील बोराची खोरी येथे, जांभळी येथील ऑक्सिजन पार्क, दानोळीतील सह्याद्री देवराई, अतिग्रे येथील के.जे.बी. पार्क, बाहुबली डोंगर पायथा येथे एक हजारपेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी वैयक्तीक घरी, शेतात व सर्वांनी मिळवून सार्वजनिक ठिकाणी असे एकूण ६१०० झाडांचे वृक्षारोपण केले.
यामध्ये शरद शिक्षण संकुलातील सर्व कॉलेजचे स्टाफ, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, जलमित्र-मजले, आम्ही जांभळीकर फाऊंडेशन, पालवी एक निसर्ग स्पर्श ग्रुप- दानोळी, के.जे.बी. पार्क- अतिग्रे, निसर्गमित्र- कुंभोज व बाहुबलीतील विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. शरद इंजिनिअरिंग, शरद पॉलिटेक्निक, शरद कृषी, शरद आयटीआय, शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स, शरद हॉस्पिटल, शरद फार्मसी, शरद नर्सिंग, शरद स्कूल या संस्थानी हा उपक्रम राबविला.
यामध्ये सिताफळ, मोर आवळा, चिंच, लिंबू, चाफा, पेरु, पाम, देशी बदाम, करंज, शेवगा, शिवन, कांचन, जाईजुई, कडिपत्ता, बेल, तगर, सिल्वर ओक, शंकासूर, पारिजातक, जास्वंद या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जांभळीतील ऑक्सिजन पार्कमध्ये झाडांना पाणी पुरविण्यासाठी ठिबक संच देण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुक्रवारपासून सायंकाळपासूनच वृक्षारोपणास सुरुवात झाली. दिवसभर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करुन सोशलमिडीयावर फोटो शेअर केले.तसेच महाविद्यालयीन स्टाफने कॉलेज ते नृसिंहवाडी पायी जावून दर्शन घेतले. तसेच वृध्दाश्रमाला साहित्य, धान्य भेट दिले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.