शरद इन्स्टिट्युटच्या ५ विद्यार्थ्यांची एक्स्परेट कंपनीत निवड
यड्राव:राम आवळे
दि. ३ जुलै: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एक्स्परेट लिमिटेड या यूके आधारित सॉफ्टवेअर कंपनीत निवड झाली आहे.कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील संकेत सावंत, सृष्टी पाटील, ऋतुजा पाटील, रुनमयी झांबरे आणि तौफिक बाडकर या विद्यार्थ्यांनी या निवडीत यश मिळविले.
एक्स्परेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी असून, यूके आणि भारतात तिची कार्यालये आहेत. कंपनीकडून नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणे, तसेच दीर्घकालीन विकास प्रकल्पांसाठी आउटसोर्सिंग सेवा पुरविण्यात येतात.
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण उपक्रमांचा मोलाचा वाटा राहिला. महाविद्यालयाकडून स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्निकल कौशल्य प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, तसेच इंडस्ट्री तज्ज्ञांचे मार्गदर्शन या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत दुसऱ्या वर्षापासून प्रोजेक्ट व तृतीय वर्षापासून अॅप्टीट्युड व कोडींग स्कीलचे प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणामुळे मुलाखतीदरम्यान आत्मविश्वास वाढून यश मिळाले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. यशस्वी निवड प्रक्रियेत ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलच्या प्रा. नेहा प्रसून यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.