डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर निवड
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. ३ जुलै: इचलकरंजीतील डीकेटीई संस्थेच्या एमबीए विभागाने यशाचा नवा उच्चांक गाठला असून, विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची विविध आघाडीच्या नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजसह निवड झाली आहे. या यशस्वी निवडीत डीमार्ट, ऍक्सिस बँक, अदित्य बिर्ला कॅपीटल, एसयुडी लाईफ, टाटा एआयजी, एसबीआय हेल्थ, ऍक्युटेक पॉवर सोल्यूशन्स, सॅक सेमीकंडक्टर, बजाज फायनान्स, आयसीएफईआय, आयप्रोसेस, स्टार लोकल मार्ट अशा प्रतिष्ठित कंपन्यांचा समावेश आहे.नुकतेच एनबीए मानांकन प्राप्त झालेल्या डीकेटीईच्या एमबीए विभागाने शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यावसायिक संधी यामध्ये उत्तम समन्वय साधला आहे. प्लेसमेंटसाठी विभागाकडून वेळोवेळी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल कार्यशाळा, मुलाखतींचे प्रशिक्षण तसेच वैयक्तिक तयारी यासारखे उपक्रम राबवले जातात.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना देशभरातील नामांकित बँका, फायनान्स कंपन्या व कॉर्पोरेट क्षेत्रात स्थान मिळते. याआधीही अनेक विद्यार्थ्यांची निवड पुणे, मुंबई, बेंगळुरु येथील आघाडीच्या कंपन्यांमध्ये झाली आहे.
डीकेटीईचा एमबीए अभ्यासक्रम हा इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण पर्याय ठरला आहे. येथे नियमितपणे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जातात. प्रशिक्षण प्रक्रियेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.हा यशाचा टप्पा संस्थेच्या शिक्षणपद्धतीतील गुणवत्ता, तंत्रशुद्ध तयारी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे फलित आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि सर्व ट्रस्टी मंडळाच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना या यशामध्ये संचालिका डॉ. एल.एस. अडमुठे, विभागप्रमुख प्रा. पी.एस. जाधव, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच टीपीओ प्रा. ए.एस. गणपते यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.